साईरत्न बहुउददेशीय संस्थेच्या संकेत स्थळावर प्रथम आपले मनःपुर्वक स्वागत आपण आता पर्यंत अनेक सामाजीक संस्थाशी परिचीत असाल अश्याच प्रकारची आपल्या स्मरणात राहणारी एक संस्था साईरत्न बहुउददेशीय संस्थेच्या असेल अशी खात्री देतो. प्रत्येक क्षणी, प्रत्येक गोष्टीत कोणत्याही कामात फक्त नफा व तोटयाचा विचार करणाऱ्या आजच्या आधुनिक युगात सर्वत्र नीती, प्रामाणीकपणा , माणुसकी , सेवाभाव अश्या मुल्यांचा बोजवारा उडतांना दिसतोय. हयामुळे सध्या सर्वदूर निराशेचा अंधार बोकाळलाय. मात्र प्रत्येक गोष्टीला अपवाद असतात या न्यायाने आजच्या हया निराशेच्या अंधकारातही सामाजिक, शैक्षणीक, सांकृतिक व क्रिडा क्षेत्रामधे " सेवा है यज्ञकुंड समिधासम हम " समर्पणच्या भावनेतुन समाजातील तळागाळातील जनतेपासुन ते उच्चभ्रू पर्यंत सर्वांसाठी काहीतरी करण्याच्या उद्शाने करण्यात आली. जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले हे सानेगुरुजीचे विचार कृतीद्वारे स्पर्श ठरविण्याचा आटोकाट प्रयत्न करीत आहोत. संस्थेने शासनाच्या अनुदानाचा, किंवा नफा -तोटा या व्यापारी तत्वाचा यत्किंचतही विचार न करता या विचारांवर निष्ठा ठेवत आपल्या कार्याचा जागर सुरु ठेवलाय.
समाजॠण फेडण्याचा एक छोटासा प्रयत्न !
