विविध सामाजिक प्रश्नांवर सातत्याने लढा देणार्या सामाजिक कार्यकर्त्या, पंढरपूरमधील ‘साईरत्न बहुउद्देशीय संस्थेच्या अध्यक्षा’ रत्नप्रभा पाटील या महिलांच्या सबलीकरणासाठी अहोरात्र झटत आहेत.
थोर समाजसेवक आण्णा हजारे, किरण बेदी, मेधाताई पाटकर यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून त्यांनी समाजसेवेचा वसा घेतलेला आहे. बचत गटाच्या माध्यमातून त्यांनी केलेले महिलांचे मजबूत संघटन, नगरपालिका, जिल्हा परिषद, व विविध शासकीय कार्यालयातून रखडलेल्या नागरिकांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी मुख्यमंत्री, आयुक्त, जिल्हाधिकारी, मुख्याधिकारी, व विविध प्रशासकीय अधिकार्यांना निवेदन देवून, प्रत्यक्ष भेटून त्यांनी अनेकांना न्याय मिळवून देण्याचे कार्य केलेले आहे. निसर्गाचे रक्षण, शोषित-अन्यायग्रस्तांना मदत, होतकरू गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मदत, परित्यक्त्या, आर्थिक संकटात सापडलेल्या अनेक महिलांच्या हक्कासाठी लढा देवून कित्येक महिलांच्या जीवनात आनंदाचे क्षण फुलविण्याचे त्यांनी केलेले कार्य, शेतकर्यांच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरुन त्यांनी केलेली आंदोलने, ‘स्वच्छ आणि सुंदर’ शहरीकरणासाठी डिजीटलमुक्ती आंदोलन, वृक्षारोपन, रस्त्यांच्या प्रश्नाबाबत प्रशासकीय अधिकार्यांकडे त्यांनी केलेला पाठपुरावा यांसारख्या अनेक कार्यातून त्यांनी आपल्या समाजकार्याची चुणूक दाखविलेली आहे.
त्या म्हणतात, ‘‘कुणीतरी महिलांच्या न्याय-हक्कासाठी पुढे आले पाहिजे या हेतूने मी समाजकार्यात उतरले. सामान्य कुटूंबात जन्म झाला... आईच्या सुसंस्काराने समृध्द झाले... तिच्या छत्रछायेखाली मोठी झाले... समाजसेवेचे बाळकडू तिच्याकडूनच मिळाले.... पुढे सासरी आल्यानंतरही आईची शिकवण विसरले नाही... रंजल्या-गांजलेल्यांची सेवा करताना जो आनंद मिळतो तो कशातच मिळत नाही.... त्यातून पांडूरंगाच्या आणि संत सज्जनांच्या आशिर्वादाने समाजसेवेसाठी बळ मिळत गेले... बचत गटाची स्थापना केली आणि महिलांच्या सबलीकरणासाठी उभारलेल्या या रोपट्याचे वृक्षात रुपांतर झाले.... अनेक महिलांशी सुसंवाद साधला गेला... वेगवेगळ्या स्वभावाच्या... वेगवेगळ्या समस्यांनी ग्रासलेल्या.... वेगवेगळ्या भावविश्वात रममाण असणार्या या महिलांशी हितगुज करताना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली... ती म्हणजे, ‘‘सगळ्यांचे प्रश्न वेगवेगळे, आर्थिक स्तर वेगवेगळा, जाती-पाती वेगवेगळ्या... मात्र सगळ्यांच्यात आत्मविश्वास अगदी ठासून भरलेला... मी ठरवले या महिलांच्या आत्मविश्वासाचे सोने करायचे... ज्यांना आर्थिक गरज होती त्यांना प्रसंगी पदरमोड करुन सहकार्य केले... उभे केले... सन्मानाने जगायला शिकविले... स्वयंरोजगाराच्या माध्यमातून अनेक भगिणींच्या हाताला काम दिले.... त्यांच्यातील आत्मविश्वासाची आणि बळाची जाणीव त्यांना करुन दिली... पुढे माझ्या बचत गटाबरोबरच मी अनेक महिलांना बचत गट स्थापन करण्यासाठी प्रेरीत केले.... प्रथम महिलांना स्वावलंबी बनविले आणि हळू-हळू त्यांच्यात समाजकार्याची आवड निर्माण केली... आज मी जे कांही कार्य करते ते धाडसाने, आत्मविश्वासाने आणि समाजसेवेच्या तळमळीने करते... जे करते ते मनापासून जीव तोडून करते... माझ्या महिला भगिणींच्या सहकार्यातूनच मी अनेक आंदोलनात यश मिळविले... कुणाच्या दबावाला न भिता खंबीरपणे माझ्या निर्णयावर ठाम राहिले.... समाजकार्य करताना अनेक अडचणी आल्या.... समाजसेवेला राजकीय पाठबळ हवे असे वाटू लागले... माझ्या अनेक महिला भगिणींनी आग्रह केला आणि ठरवले.... पंढरपूर-मंगळवेढा मतदार संघातून आपण ‘अपक्ष’ लढायचे.... एकदा ठरले की माघार नाही हे आमचे तत्व.... पंढरपूर-मंगळवेढा मरदार संघासाठी मी नवखी नाही... अनेक सामाजीक कार्याच्या माध्यमातून जनतेशी संपर्क साधलेला आहे... यापूढे मतदारसंघाचा दौरा करुन महिलांशी सुसंवाद साधून त्यांच्या समोर मी माझी भूमीका मांडणार आहे... आणि मला खात्री आहे की, जनतेच्या दरबारात सगळे समान असतात... माझ्यासमोर कोण किती मोठा उभा आहे, कुणी किती वाईट आहे... हे पहाण्यापेक्षा मी जनतेसाठी काय करु शकते? हे सांगण्याचा माझा प्रयत्न केला... मी हरले मात्र अयशश्वी नक्कीच झाले नाही... या निवडणुकीत मला लाख मोलाची असंख्य महिला आणि युवकांची कार्यकर्त्यांच्या रुपाने एक मजबुत फळी मिळाली.’’
त्यांच्याशी बोलताना त्यांच्या व्यक्तीमत्वातील आणि समाजकार्याबाबतचे अनेक पैलू समोर आले. त्यांनी पंढरपूरमधील मद्य व मांस विक्रीची दुकाने शहराबाहेर हलवावीत याबाबतचे प्रयत्न चालू केले आहेत. 2015 मध्ये गरजु महिलांसाठी ‘साईरत्न महिला को-ऑप.बँकेची स्थापना करण्यासाठीची तयारी पुर्ण झालेली आहे. नगरातील व उपनगरातील अतिक्रमणे हटवण्यासाठी त्यांनी धडाडीने प्रयत्न केलेले आहेत. विविध शासकीय योजनांची माहिती सर्वसामान्य महिलांना देवून विविध योजनांचा लाभ गरजूंना मिळवून देण्यासाठी त्यांनी अविरत प्रयत्न केले आहेत. बचत गटांमार्फत अल्प खर्चामध्ये महिलांसाठी विविध धार्मिक स्थळे व पर्यटन स्थळांची सफर घडवून आणलेली आहे. सातबारा उतार्यावर शेतकरी पती-पत्नीचे दोघांचेही नांव असावे, दोघांच्या नावाने बँकेत संयुक्त खाते असावे याबाबत त्यांनी मुख्यमंत्र्यांना निवेदन देवून याबाबतचा पाठपुरावा चालु आहे. जनलोकपालसाठी आण्णांनी केलेल्या उपोषणास अनेक महिलांसमवेत पाठींबा दिला. ज्योतीबासारख्या देवस्थानांचा परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी कोल्हापूरचे तत्कालीन जिल्हाधिकारी यांना याबाबतचे निवेदन देवून पाठपूरावा केला. गुढी पाडवा, राखी पौर्णिमा यांसारखे सण ‘पालवी’, ‘मुकबधीर प्रशाला’ ‘नवरंगे बालकाश्रम’ यांसारख्या संस्थांमध्ये खाऊ वाटप, शालेय साहित्य वाटप, कपडे वाटप, पंखे वाटप व अन्य मार्गाने विविध प्रकारची मदत त्या सातत्याने करतात. एप्रिल 2013 मध्ये त्यांनी वारकरी सांप्रदायातील महिला मंदिर समितीवर संचालक म्हणून घ्याव्यात अशी मागणी जिल्हाधिकार्यांकडे करुन त्याबाबतचा पाठपुरावा केला. नुकतीच पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरात महिला पुजार्यांची नियुक्ती झाली हे त्यांच्या प्रयत्नांना मिळालेले यश म्हटले तर वावगे ठरणार नाही. पंढरपूरमधील रेल्वे पुलाखाली पाणी साठल्यामुळे वाहतुकीचा खोळंबा होवून वर्षानुवर्षे नागरिकांना पावसाळ्यात त्रास सहन करावा लागतो. मात्र याबाबत प्रसिध्दीमाध्यमांशिवाय कुणीही राजकीय नेता ठोस पावले उचलत नाही. ही बाब शासनाच्या लक्षात आणून देण्यासाठी त्यांनी नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एक पत्रक पाठविले आहे. समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणार्या व्यक्तींना संस्थेमार्फत ‘पुरस्कार वाटप’ केले जाते. यामध्ये प्रामुख्याने पत्रकारिता, सामाजिक, साहित्यीक, प्रशासकीय उत्कृष्ट सेवा अशांचा समावेश होतो. मोठ्या प्रमाणात गॅस सिलेंडरची आवक होवूनही कधी-कधी नागरिकांना गॅस वेळेवर मिळत नाही. गॅस एजन्सींकडून नाहकपणे कृत्रीम टंचाई निर्माण केली जाते. याबाबत आवाज उठवून त्यांनी असे गैरप्रकार टाळण्यासाठी प्रयत्न केलेले आहेत. येथील उद्योग प्रेरक रविराज सोनार यांच्या मार्गदर्शनाखाली बचतगटामार्फत अगरबत्ती निर्मिती आणि विक्री याबाबतचे महिलांना प्रशिक्षण देवून रोजगार निर्माण करुन दिला. यु.पी.एस्.सी., एम.पी.एस्.सी अशा विविध स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळविलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचे सत्कार संस्थेमार्फत दरवर्षी आयोजित केले जातात.
सामाजिक कार्याबरोबरच रत्नप्रभा पाटील या एक उत्तम कवयित्री आहेत. 2013 मध्ये गोकुळअष्टमी दिवशी त्यांचा ‘दर्वळ चाफा’ हा कविता संग्रह प्रतिष्ठीत डॉ.सतीश वळसंगकर सर यांच्या हस्ते प्रकाशित झाला. दि. 15 ऑगस्ट 2014 रोजी त्यांचा दुसरा ‘कण्हेर’ हा कविता संग्रह जेष्ठ समाजसेवक आण्णा हजारे यांच्या शुभहस्ते प्रकाशित झाला. तसेच त्या ‘माझे पंढरपूर’ यावर लेख लिहीत आहेत.
नुकताच त्यांना सोलापूर स्थित सावित्रीबाई फुले शिक्षण व बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने वर्ष 2015 चा ‘सावित्री-जिजाऊ लेकी सन्मान-2015’ हा पुरस्कार प्रदान करुन दि. 10 जानेवारी 2015 रोजी गौरविण्यात आले.