दुधदरात केलेली 3 रु. कपात रद्द करावी तसेच दुधाचे दर वाढवावेत व दुधउत्पादक शेतकर्‍यांवर होणारा अन्याय दूर करावा या मागणीबाबतचे निवेदन साईरत्न बहुउद्देशीय संस्थेच्या अध्यक्षा व सामाजिक कार्यकर्त्या सौ.रत्नप्रभा चांगदेव पाटील यांनी दि. 27/11/2014 रोजी पंढरपूरचे प्रांताधिकारी श्री.तेली यांना दिले आहे.

          
पशुखाद्याचे दर 20% ने वाढवलेले आहेत मात्र दुध विक्री दरात मात्र  रु. 3 रु. ने कपात केलेली आहे. यामुळे शेतकर्‍यांवर खुप मोठा अन्याय होत आहे. एकीकडे शेतकरी दुष्काळाने पुरता होरपळून गेलेला असताना शासनाने असा दुर्दैवी निर्णय घेतला आहे. सद्यस्थितीत पशुधन जगवण्यासाठी शेतकर्‍यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. शेतकर्‍यांच्या अडचणी समजून घेवून शासनाने वाढवलेले पशुखाद्याचे दर कमी करावेत आणि दुधाला योग्य दर द्यावा अशी मागणी या निवेदनाद्वारे त्यांनी केली आहे. 
            सदर निवेदनाच्या प्रती माहितीस्तव मा.मुख्यमंत्री महाराष्ट्र  राज्य, दुग्धविकास मंत्री महाराष्ट्र राज्य, जिल्हाधिकारी सोलापूर, खा.विजयसिंह मोहिते-पाटील, आ.भारत तुकाराम भालके, सोलापूर जि. दुध संघाचे अध्यक्ष प्रशांत परिचारक व तहसिलदार पंढरपूर यांनाही पाठविण्यात आलेल्या आहेत.  
 
Top