सर्वांनीच आपले शहर आणि परिसर स्वच्छ ठेवण्यास तत्पर असावे- रत्नप्रभा पाटील हल्ली नागरिक स्वच्छतेबाबत सतर्क झालेले आहेत. मात्र आपल्या घराची स्वच्छता करणे एवढीच आपली जबाबदारी नाही तर आपले शहर आणि परिसर स्वच्छ ठेवण्यासही सर्वांनी तत्पर असणे आवश्यक बनले आहे.
गणेश विसर्जनानंतर मी आणि माझ्या महिला सहकारी चंद्रभागेच्या वाळवंटात गेलो असताना आम्हास जे चित्र दिसले ते ‘लाजिरवाणे’ होते. वाळवंटात सर्वत्र भग्न अवस्थेतील अनेक गणेश मूर्ती विखूरलेल्या होत्या. भाविकांनी टाकलेले निर्माल्याचे थरांचे आणि इतर वस्तुंचे खच पसरेलेले होते. सर्वत्र दुर्गंधीचे पसरलेले सामा्रज्य पाहून आम्ही तात्काळ निर्णय घेतला की, वाळवंट स्वच्छ करण्याचे कार्य आपण करायचे. आम्ही सर्व महिलांनी मिळून सर्व गणेश मुर्ती जमा केल्या. चंद्रभागेच्या पात्राची स्वच्छता केली. पंढरपूर हे अध्यात्मीक क्षेत्र... वारकर्यांचे तिर्थस्थान म्हणजेच चंद्रभागा... त्यामूळे चंद्रभागेच्या पात्राची स्वच्छता वारंवार होणे आवश्यक आहे. आम्ही हे काम केले याबाबत आम्ही समाधानी आहोत. मात्र स्वच्छ आाणि सुंदर शहरीकरणाचे स्वप्न जे आम्ही पाहिले ते प्रत्येकालाच पडावं आणि आपले शहर व परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत. महिलांच्या अडी-अडचणींबद्दल बोलताना त्या म्हणाल्या की, सामाजिक कार्यात महिलांचा सहभाग अत्यंत मोलाचा असतो. मात्र अनेक महिला स्वावलंबीच नाहीत त्यामूळे अशा कार्यात पूढे येताना महिलांना अनेक निर्बंध येतात. आज सुध्दा अनेक महिला गुणवत्ता असूनही शिक्षण, आरोग्य, व्यवसाय आणि नोकरी यांपासून वंचीत आहेत. मुलभूत सुविधांपासून वंचीत आहेत. पिढ्यान् पिढ्या वैफल्याने ग्रासलेल्या, परावलंबी जीणे जगत असलेल्या, आपल्या न्याय्य-हक्क आणि मुलभूत गरजांपासून वंचीत असणार्या
महिलांच्या ‘चौफेर विकासासाठी, उन्नतीसाठी’ महिलांच्या सबलीकरणासाठी आम्ही सर्व महिलांनी मिळून ज्या योजना आखल्या आहेत, त्या योजना आमलात आणून महिला सक्षमीकरणाचा नवा अध्याय सुरू करणार आहोत. यासाठी सर्वांचे सहकार्य अपेक्षीत आहे.