गोवा येथील 54 व्या ‘अंकूर साहित्य संमेलनात’ कवयत्री रत्नप्रभा पाटील यांचा सहभाग.....
‘आम्ही तेजशलाका-माझ्या लेखनाचे प्रेरणास्त्रोत’ या विषयावरील चर्चासत्रात विचार व्यक्त करणार ‘रणरागिणी’ ...
पंढरपूरातून एकमेव असा त्यांचा समावेश .......
दि. 27 व 28 डिसेंबर 2014 रोजी फोंडा (गोवा) येथे हे साहित्य संमेलन संपन्न होणार आहे.
पंढरपूर लाईव्ह (प्रतिनिधी) - येथील समाजसेविका साईरत्न बहुउद्देशीय संस्थेच्या अध्यक्षा व कवयत्री रत्नप्रभा पाटील यांना गोव्यात संपन्न होणार असलेल्या 54 व्या साहित्य संमेलनासाठी आमंत्रीत करण्यात आलेले असून यामध्ये त्यांचे विशेष चर्चासत्र आयोजित करण्यात आलेले आहे. दि. 27 व 28 डिसेंबर 2014 रोजी फोंडा (गोवा) येथे हे साहित्य संमेलन संपन्न होणार आहे. यामध्ये ‘आम्ही तेजशलाका-माझ्या लेखनाचे प्रेरणा स्त्रोत’ या विषयावरील चर्चासत्रात त्या आपले विचार व्यक्त करणार आहेत.
सौ. रत्नप्रभा पाटील या महाराष्ट्र राज्य साहित्य अकादमीच्या सदस्या आहेत. याचबरोबर आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संस्थेच्या सदस्या, महिला सुरक्षा समिती, पंढरपूरच्या सदस्या व शब्दांकूर साहित्य अकादमीच्या सदस्या म्हणून त्यांचे कार्य सर्वपरिचीत आहे. त्यांचे दोन ‘दरवळ चाफा’ व ‘कन्हेर’ हे कविता संग्रह प्रसिध्द झालेले असून जेष्ठ समाजसेवक आण्णा हजारे यांच्या हस्ते या कविता संग्रहांचे प्रकाशन झालेले आहे.
रत्नप्रभा पाटील यांच्या विविध क्षेत्रातील सक्रीय सहभागाबरोबरच मराठी साहित्य क्षेत्रातही त्या सक्रीय आहेत. त्यांच्या कार्याची दखल घेवून गोव्यात चालणार्या दोन दिवसीय अंकुर साहित्य संमेलनामध्ये आपले विचार व्यक्त करण्यासाठी रत्नप्रभा पाटील यांना निमंत्रीत करण्यात आले आहे. या साहित्य संमेलनात निमंत्रीत असलेल्यांपैकी पंढरपूरातून एकमेव असा त्यांचा समावेश आहे.